Saturday, March 25, 2023

नवाब मलिकांच्या विरोधात आणखी एक ईडीकडे नवी तक्रार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रुयांवर आदींची कारवाई चालली आहे. असहित राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी आज भाजपकडून अधिवेशनात केली जाणार असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आता आणखी एका जागेवरुन मलिकांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल झाली आहे. मलिकांच्या अटकेनंतर एका जेष्ठ नागरिकाने केली ईडीकडे तक्रार केली असून त्या ज्येष्ठ नागरिकाने तक्रारीत नवाब मलिकांवरती अनेक आरोप केले आहेत.

नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच नवाब मलिकांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काळ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही अधिवेशनात मालिकांचा राजीनामा घ्यायला सरकारला भाग पाडू असेही ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान नवाब मलिक यांच्यावरती जागेच्या खरेदीचा आरोप केल्याने त्यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना त्यांच्या विरोधात एका वयोवृध्द व्यक्तीने तक्रार केली असून त्यांमध्ये त्यांनी एका जागेवर मलिकांनी जबरदस्तीने कब्जा केला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. ईडीने त्यांची तक्रार नोंद केली असून त्यासंदर्भातले सगळे पेपर त्यांनी जमा केली आहेत.