Tuesday, June 6, 2023

एकहाती सत्ता : कोळे विकास सेवा सोसायटीत उंडाळकर गटाचा 13-0 ने विजय

कराड | कोळे विविध विकास सेवा सोसायटी निवडणूकीत 13-0 ने श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेलने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. सोसायटीचे सर्व विजयी उमेदवार हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य, अँड. उदयसिंह विलासराव पाटील – उंडाळकर यांचे नेतृत्व मानणारे आहेत. दरम्यान श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेलने  एकहाती सत्ता मिळवली आहे.

कोळे विविध विकास सेवा सोसायटी निवडणुकीसाठी दोन पॅनेलमध्ये लढत झाली. श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेल विरुद्ध घाडगेनाथ पॅनेल अशी लढत झाली. डॉ. अतुलबाबा भोसले व माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी घाडगेनाथ पॅनेल तयार केले होते. या विरोधात स्वर्गीय विलासकाका पाटील, अॅड. उदयसिंह पाटील यांचे कट्टर समर्थकांनी श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेल तयार करून निवडणुकीला सामोरे गेले होते. श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार सुमारे 100 ते 150 मताधिक्याने निवडून आलेले आहेत.

सर्वसाधारण मतदार संघातून ः संपत बाबाजी कदम, श्रीरंग विष्णू कराळे – पाटील, महादेव भीमराव पाटील, मोहन मारुती चव्हाण, राजकुमार भाऊ पाटील, शामराव अंतु पाटील, संतोष दादासाहेब पाटील, मंदार उत्तम शिंगण,

महिला राखीव मतदार संघातून ः यशोदाबाई कृष्णा पाटील, कलाबाई रामचंद्र शिंगण,

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून ः मन्सूर नूरमहंम्मद मुजावर,

विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गमधून ः नथुराम मारुती शिनगारे,

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून ः पंढरीनाथ गंगाराम कांबळे हे विजयी झालेले आहेत.

कोळे ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जावेद फकीर, माजी सरपंच श्रीकांत कुंभार, सोसायटीचे माजी संचालक श्रीरंग पाटील, महादेव देसाई, उपसरपंच समाधान शिनगारे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कराळे, सुधीर कांबळे, दीपक कराळे, अजिंक्य पाटील, राजेश देसाई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य, अॅड.उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.