शहरात 18 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : मोहन टॉकीज जवळ राहत्या घरात तरुणीने आज सकाळी बारा वाजेच्या सुमारास किचनमध्ये ओढाणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. ईशाने आत्महत्या सारखा टोकाचे पाऊल का उच्चले हे समजु शकले नाही.

ईशा राजेश तंगडपल्ली (18 रा. विठ्ठल मेंदी शेजारी सराफ रोड मुलमची बाजार), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 

ईशाचे वडील सलून दुकानात कामाला असून आई कपड्याच्या दुकानात काम करते.दरम्यान ईशाचे आई वडील आज कामावर गेल्यानंतर बारा वाजेच्या सुमारास आज्जी आणि लहान भाऊ घरात असताना, इशाने राहत्या घरात किचन मध्ये गळफास लावून घेतला.दरम्यान ही बाब लहान भावाच्या लक्षात येताच त्याने शेजाऱ्यांना बोलावून ईशाला घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ईशाला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Leave a Comment