49 रुपयांत 180 दिवसांचा रिचार्ज; ‘या’ टेलिकॉम कंपनीचा प्लॅन पहाच…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याचे युग हे स्मार्टफोनचे युग आहे. स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दरोज अनेक ऑफर्स आणत असतात. अशातच रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा देखील सुरु आहे. या कंपन्या ग्राहकांसाठी अनेक चांगले प्लॅन्स लाँच करतात.

मात्र आज आपण जाणून घेणार आहोत MTNL कंपनीच्या 49 रुपयांच्या धमाकेदार प्लॅनबाबत… MTNL च्या या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये कमी किंमतीत जास्त दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. चला तर मग या प्लॅनबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात …

असा आहे MTNL चा 49 रुपयांचा प्लॅन –

MTNL च्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. युझर्सना यामध्ये 60 लोकल मिनिटे आणि 20 STD मिनिटे दिली जातील. यामध्ये 1 पैसे प्रति सेकंद या दराने कॉल चार्जेस आकारले जाईल. SMS चार्ज लोकलसाठी 0.50 पैसे, नॅशनलसाठी 1.50 रुपये आणि इंटर नॅशनलसाठी 5 रुपये असेल .

MTNL च्या या प्लॅनसमोर Jio, Airtel, Wi आणि BSNL ची कोणतीही स्पर्धा नाही. या चारही टेलिकॉम कंपन्यांकडे 180 दिवसांची व्हॅलिडिटी देणारा इतका स्वस्त प्लॅन नाही.