कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरातून महाविद्यालय परिसरात जाणाऱ्या कृष्णा पुलावर वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपासू गेल्या दोन तासांपासून ही वाहतूक कोंडी झालेली असून दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. सकाळी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे रहिवाशी नागरिकांच्यासह वाहन चालक त्रस्त झालेले होते. त्यामुळे फस्ट डिसेंबर वाहतूक कोडींचा ठरलेला पहायला मिळाला.
आज बुधवारी दि. 1 डिसेंबरला सकाळी 10 वाजलेपासून कृष्णा पूलावर वाहतूक कोंडी झालेली आहे. शेजारी नविन पुलाचे काम अद्याप संथ गतीने सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच सध्या वाहतूकीस खुला असलेल्या पुलावर वाहतूकीचा खोळंबा नेहमीच पहायला मिळतो. आज फस्ट डिसेंबरला कराड शहरात येणाऱ्या नोकरदार, नागरिकांना, वाहन चालक व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या पूलावर तसेच कृष्णा नाका, कृष्णा कॅनाल या परिसरात वाहतूक कोंडी होती. या मार्गावर जवळपास 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
कराड- विटा मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका नोकरदार व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा बसला. आज शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी शाळेत उशिरा पोहचणार आहेत. कारण कराड शहरात ये- जा करण्यासाठी कृष्णा पूल हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे सध्या काम सुरू असलेल्या नविन पूलाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिक व वाहन चालकांच्यातून केली जात आहे.