नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. यादरम्यान नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थी आऊटिंग करायला गेले होते. मात्र यादरम्यान त्यांचा नागपुरातील अंबाझरी तलावात बुडून (Drowning) मृत्यू झाला आहे. हे दोन्ही जण चप्पल धुवायला तलावात उतरले होते मात्र, त्यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही आणि बुडून (Drowning) त्यांचा मृत्यू झाला. काल दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
काय घडले नेमके ?
मिहीर शरद उके व चंद्रशेखर किशोर वाघमारे अशी मृत विद्याथ्यांची नावे आहेत. मिहीर उके व चंद्रशेखर वाघमारे हे रविवारी दुपारी अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत अक्षय मेश्राम व प्रशिक भिडे हे त्यांचे दोन मित्रसुद्धा होते. अंबाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या होत्या. त्यामुळे आपल्या चपला धुण्यासाठी हे चौघेजण तलावातील पाण्याजवळ गेले.याचवेळी मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात (Drowning) पडले.
यावेळी पाण्याची खोली जास्त होती. त्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले (Drowning). यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यांच्या मित्रांनी तेथील नागरिकांनाही आरडाओरड करत मदतीला बोलावले. मात्र, काही फायदा झाल नाही. तोपर्यंत उशीर झाला होता आणि दोघांच्याही नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर अक्षय व प्रशिकने लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच दोन्ही मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
हे पण वाचा :
जनतेने एकदा ठरवले तर भले भले घरी बसवतात; अजित पवारांचं सूचक विधान
अमेरिकन बाजारातील घसरणीने मोडला 50 वर्षांचा विक्रम !!!
हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान