जिंतीत वन विभागाच्या रेस्क्यू मोहिमेत वाघदऱ्यात 2 बिबट्याचे वास्तव्य उघड

leopard in karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील जिंती येथे वाघदरा शिवारात बिबट्याचा वावर वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेली तीन ते चार दिवस झाले बिबट्याचे आवाज ऐकू येऊ लागल्याने या ठिकानाची वनविभाग व पुणे येथील रेस्क्यू टीम यांनी ड्रोनव्दारे पाहणी केली.

जिंती येथील वाघदरा शिवारात 5 जानेवारी रोजी वनविभाग व पुणे येथील रेस्क्यू टीम यांनी ड्रोन व्दारे या परिसराची पाहणी केलीड्रोनद्वारे पाहणी केली. यावेळी ड्रोनच्या पाहणीत नर व मादी जातीचे दोन बिबटे आढळून आले. दरम्यान वन विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. प्राण्यांचा सध्याचा काळ हा प्रजनन काळ असल्याने ते एकत्र आले आहेत. आणखी काही दिवस ते एकत्र राहतील या कालावधीत या परिसरात ग्रामस्थांनी जाणे टाळावे, असे आवाहन कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी केले.

जानेवारी महिना हा तसा पाहिला तर प्राण्यांचा प्रजननाचा काळ असल्याचे म्हंटले जाते. दरम्यान अशात जिंतीतील वाघदरा परिसरात नर व मादी बिबट्या आढळल्याने व त्यांचे आवाज ऐकू येऊ लागल्याने वन विभागाने प्रथमच ड्रोनद्वारे या ठिकाणी पाहणी करण्याची मोहीम राबविली.

वनविभागाचे उपवसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनंरक्षक महेश झांजूर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल कोळे, बाबुराव कदम वनरक्षक सचिन खंडागळे, सुभाष गुरव, वनसेवक सतिश पाटील व पुणे येथील रेस्क्यु टिमचे कर्मचारी यांनी एकत्रित रेस्क्यूची मोहीम राबवली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य त्या सुचना ग्रामस्थांना केल्या.