भररस्त्यात तरुणांची तुफान हाणामारी, व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हीपण व्हाल थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ हैराण करतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी तुम्हाला हे व्हिडिओ पाहून संतापही येतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. कारण या व्हिडिओमध्ये दोन तरुण रस्त्यावरच हाणामारी (Fight On Road) करताना दिसतात, मात्र व्हिडिओच्या शेवटी असं काही घडतं, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण रस्त्यावरच हाणामारी (Fight On Road) करताना दिसत आहेत. मात्र मोठी गोष्ट म्हणजे या भांडणाचा शेवट काही औरच होतो. तुम्ही अनेकदा लोक रस्त्यावर हाणामारी (Fight On Road) करताना पाहिलं असेल. मात्र, सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओ अगदी वेगळा आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला रस्त्यावर पाडून मारहाण करताना दिसत आहे. हा व्यक्ती अगदी रागात खालच्या व्यक्तीला मारत आहे. मात्र दुसरा व्यक्ती हुशारीने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की निळ्या रंगाच्या टी-शर्टमधील व्यक्ती काळ्या रंगाच्या टी-शर्टमधील व्यक्तीला आधी खाली पाडून मारतो आणि नंतर गाडीकडे त्याला खेचत नेतो आणि त्याचा गळाही दाबू लागतो. आता तुम्हाला वाटेल की भांडण खूप तीव्र वळण घेत आहे, परंतु जेव्हा काळ्या टी-शर्टमधील व्यक्तीचा चष्मा खाली पडतो तेव्हा तो उचल्यासाठी खाली वाकतो आणि त्यांची भांडणं (Fight On Road) तिथेच संपल्याचं पाहायला मिळतं. यानंतर जे घडतं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या हाणामारीनंतर दोघंही हस्तांदोलन करतात आणि तिथून निघून जातात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा

एकवीरेला चाललेल्या कारने बोरघाटात घेतला पेट, व्हिडिओ आला समोर

‘या’ देशात चक्क युरीनपासून बनवली जाते बिअर !!! तुम्ही ते पिण्याचे धाडस कराल का???

पेट्रोल पंपावर आग लागताच धावू लागले लोक, धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव

एका महिन्यात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 158.59% रिटर्न !!!

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

Leave a Comment