हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेशन कार्ड (Ration Card) हे भारत सरकारने नागरिकांसाठी जारी केलेले महत्त्वाचे कागदपत्र आहे. याच्या मदतीने नागरिकांना फेअर प्राइस किंवा शिधा दुकानदारांकडून कमी दरात अन्नधान्य ( रेशनिंग ) खरेदी करता येते. त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ,गहू, तेल अशा अनेक गोष्टी कमी किंमतीत दिल्या जातात. प्रत्येक राज्य सरकार रेशन कार्डसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देते. तर ती अर्ज प्रकिया कशी करायची ,हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर चला त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ऑनलाइन रेशन कार्डसाठी अर्ज –
ऑनलाइन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम संबंधित राज्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी mahafood.gov.in या वेबसाइट्सवर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे. या वेबसाइटवर जाऊन, अर्ज फॉर्म भरून त्यात आवश्यक असलेली माहिती भरावी लागते. अर्ज फॉर्म भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागते, जसे की ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, आणि इतर आवश्यक कागदपत्रे . त्यानंतर, अर्जासाठी आवश्यक शुल्क भरून अर्ज सबमिट करावा लागतो. या प्रक्रियेनंतर संबंधित विभाग अर्जाचा तपास करून योग्यतेनुसार रेशन कार्ड जारी करते.
रेशनिंग कार्डसाठी ऑफलाइन अर्ज –
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम आपल्याला जवळच्या शिधा दुकानावर किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज फॉर्म मिळवावा लागतो. फॉर्म मिळविल्यानंतर, त्यामध्ये आवश्यक असलेली माहिती व्यवस्थितपणे भरून, त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी जोडून, संबंधित अधिकाऱ्याकडे द्यावीत . त्यानंतर, संबंधित अधिकारी अर्जाची तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील प्रक्रिया सुरू करतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर, रेशन कार्ड जारी केले जाते.
रेशन कार्डचा स्टेटस असा तपासा –
रेशन कार्डच्या अर्जाचा स्टेटस तपासण्यासाठी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोर्टल (NFSA.gov.in) वापरता येते. सर्वप्रथम, nfsa.gov.in या वेबसाइटला भेट द्या. वेबसाइटवर Citizen Corner विभागात जाऊन Know Your Ration Card Status पर्याय निवडा. त्यानंतर, आवश्यक माहिती जसे की रेशन कार्ड नंबर आणि सुरक्षा कोड टाका. नंतर Get RC Details या बटणावर क्लिक करा. यानंतर, तुमच्या अर्जाचा स्टेटस स्क्रीनवर दिसेल. या माध्यमातून तुम्ही तुमच्या रेशन कार्डच्या अर्जाची स्थिती सहजपणे तपासू शकता.