पुलवामा: सुरक्षा दलांनी केला ३ दहशतवाद्यांचा खात्मा

0
39
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कंगन वानपोरा भागात भारतीय सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. दोन्ही बाजूने गोळीबार सुरु होता. सीआरपीएफ आणि 55 राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांविरुद्ध ही कारवाई केली आहे.

गेल्या 24 तासात जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे. मंगळवारी पुलवामामध्येच भारतीय सेनेकडून जैशचे 2 दहशतवादी ठार करण्यात आले होते.एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुप्त सुचनेच्याआधारे, ज्यावेळी सर्च ऑपरेशन सुरु होत, त्याचवेळी लपलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजून गोळीबार सुरु झाला.

दहशतवादी लपलेल्या जागेला सुरक्षा दलाकडून घेराव घालण्यात आला होता. दहशतवाद्यांना बाहेर पडण्यास कोणताही मार्ग नव्हता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंगन वानपोरा भागात 2-3 दहशतवादी लपले असल्याची माहिती आहे. कोणतीही अफवा पसरवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, त्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here