सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 529 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 127 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 994 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 60 हजार 555 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 32 हजार 990 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3462 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात 33 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स गठीत
कोरोना संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये १३ तज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत.