वासोटा किल्ल्यावर एकाच वेळी 80 बोटीतून 2 हजार पर्यटक

Vasota fort
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा जिल्हा निसर्ग संपन्न व गडकिल्यांचा असा आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास, तापोळा, प्रतापगड भागात सध्या पर्यंटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. अशातच सर्वात गड सर करण्यासाठी अवघड असणारा, ट्रेकिंगसाठी मनमोहित करणारा किल्ला म्हणजे वासोटा हा होय. या वासोटा किल्ला या पर्यटन स्थळी आज 80 बोट मधून तब्बल २ हजार पर्यटक आणि ट्रेकर्स गेले आहेत.

नाताळ व नवीन वर्षाच्या सुरुवातीला सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी तापोळा, वासोटा किल्ला अशा पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. शिवसागर जलाशयातील बोटिंगसह वासोटा किल्ल्याची ट्रेकिंगचाही आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत. या पर्यटन स्थळावर नैसर्गिकसह येथील पारंपारिक नैसर्गिक वातावरण व अस्सल ग्रामीण जीवन याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा वाढता ओघ हा वासोटा किल्ला आणि तापोळा येथील भागात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे

वासोटा जंगल भटकंती एक रोमांचक सफर आहे. वाघासारखा दबा धरून अरण्याच रक्षण करणारा, दाट झाडीची झूल पांघरलेला, कोयनेच्या घनदाट जंगलातला हा एक वनदुर्ग म्हणजे किल्ले वासोटा ऊर्फ व्याघ्रगड. साहसाची अनुभूती देणारा, रानामध्ये वसलेला, दुर्गम असणारा हा किल्ले वासोटा म्हणजे जावळीच्या मुलुखातील एक दुर्गरत्नच. जावळी खोऱ्यातून वाहणारी कोयना नदी आणि या कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडे घनदाट जंगलात हा वासोटा किल्ला वसलेला आहे.