हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील प्रत्येक सामान्य नागरीक पै न पै मिळवण्यासाठी दिवस आणि रात्र काबाडकष्ट कष्ट करत असतो. तरी देखील काहीशे हजार रुपये आपल्या खात्यात जमा होण्यासाठी बराच कालावधी जाऊ द्यावा लागतो. काहींना तर आपल्या गरजा भागवता भागवता दमडी देखील आपल्या खात्यात जमा करणे शक्य होत नाही. मात्र आम्ही तुम्हाला असे सांगितले तर तुमच्या खात्यात अचानक काहीशे कोटी रुपये जमा झाले आहेत. तर विश्वास बसणार नाही न तुमचा पण तामिळनाडू मधील मोहंमद इदरीस ह्याच्या खात्यात अचानक 753 कोटी रुपये जमा झाले त्यामुळे त्याला धक्काच बसला.
मोहंमद इदरीस हा तामिळनाडूचा रहिवासी असून तो एका औषधीच्या दुकानात कामाला आहे. मोहम्मदच्या सांगण्यावरून त्याने त्याच्या मित्राला आपल्या खात्यातून 2000 रुपये रक्कम पाठविली व त्यानंतर आपल्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातील रक्कम तपासल्या नंतर त्याच्या असे लक्षात आले की खात्यात तब्बल 753 कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यासंदर्भात त्याने बँकेच्या शाखेशी संपर्क केला असता बँकेने त्याचे खाते फ्रीज केले आहे.
दरम्यान, याआधी देखील तामिळनाडू राज्यात अश्याच तीन घटना घडल्या आहेत. तंजावर येथील एका व्यक्तीच्या नावावर अचानकपणे 753 कोटी रुपये आले होते. त्यामुळे त्याला देखील आश्चर्य वाटले होते. राजकुमार नावाच्या कॅब ड्राइव्हरच्या खात्यात देखील अचानक 9 हजार कोटी रुपये दाखवत होते. तेव्हा कळाले की बँकेकडून चुकीने ही रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली.