हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मणिपूर येथील महिलांची नग्न करून दिंड काढल्याची घटना ताजी असतानाच आता अशाच प्रकारची माणुसकीला काळिमा फासणारी घटना पश्चिम बंगालमध्ये सुद्धा घडली आहे. पश्चिम बंगाल येथील मालदा जिल्ह्यातील पकुहाट भागात २ महिलांना अर्धनग्न करून जमावाने भरदिवसा मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. मात्र ही घटना नेमकी कधीची आहे हे समजू शकलेलं नाही.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिलांना स्थानिक लोकांनी चोरीच्या आरोपाखाली पकडले होते, त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली होती. काही महिलांनी पीडितांवर प्राणघातक हल्ला केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी त्यांच्या साड्या फाडल्या आणि चपलेने मारत जवळजवळ पूर्णपणे नग्न केले. पीडित महिला आरडाओरडा करत आहेत परंतु तरीही जमावाकडून त्यांना मारहाण सुरूच आहे. हा विडिओ पाहताच माणूस किती खालच्या पातळीवर उतरला आहे हे स्पष्ट होत आहे.
https://twitter.com/VarunKrRana/status/1682615162635980800?s=20
या घटनेनंतर, पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख डॉ. सुकांता मजुमदार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर राज्य सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे कि, पश्चिम बंगालमधील आदिवासी महिलांसोबत आणखी एक भयानक घटना. मालदा येथे दोन आदिवासी महिलांना नग्न करून निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. इतर घृणास्पद घटनांप्रमाणेच, दीदी यावेळी सुद्धा गप्प आहेत आणि स्वतःच्या नियमानुसार कोणतीही कारवाई करत नाहीत. I.N.D.I.A. याचा निषेध का करत नाही? असं म्हणत त्यांनी देशभरातील विरोधकांवर सुद्धा हल्लाबोल केला आहे.