2 वर्षांची प्रविशा ठरली ‘सर्वाधिक स्मरणशक्ती असलेली मुलगी’; OMG बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवला राष्ट्रीय विक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्याकडे असलेल्या अंगभूत कौशल्यांच्या जोरावर विविध प्रकारचा बहुमान मिळवणारे लोक आपल्या पाहण्यात असतात. काहींना आपण वैयक्तिकरित्या ओळखतो तर काहीजणांना वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलमधेच पाहिलं जातं. मूळची संगमनेरची असलेली २ वर्षांची प्रविशा विशाल उबाळेसुद्धा अशाच एका पुरस्काराची मानकरी ठरली आहे. ‘गर्ल विथ हाय मेमरी स्किल्स’ म्हणजेच ‘सर्वाधिक स्मरणशक्ती असलेली मुलगी’ हा किताब तिने नुकताच मिळवला आहे. आश्चर्यकारक घटनांची दखल घेणाऱ्या ‘ओह माय गॉड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये तिच्या नावाची नोंद झाली आहे.

काय आगे प्रविशाचं कर्तृत्व – लॉकडाऊन काळात लांबणीवर पडलेल्या या विक्रमाची तयारी प्रविशाने वर्षभर आधीच केली होती. स्मरणशक्तीची परीक्षा पूर्ण करण्यासाठी तिने विशेष तयारी करताना १५० हून अधिक वस्तूंची नावं तोंडपाठ केली होती. वस्तू ओळखण्याचं तिचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. एकाच वेळी ५० फळांची, ५० प्राण्यांची, १० प्राण्यांच्या आवाजांची, ७ रंगांची, ९ वेगवेगळ्या आकारांची, सोशल मीडियाच्या १५ चिन्हांची, २५ भाजीपाल्यांची, महाराष्ट्रातील ७ संतांची, मानवी शरीराच्या सर्व अवयवांची, २६ इंग्रजी वर्णांक्षरांची, १० वाहनांची, १० इलेक्ट्रॉनिक वस्तूंची, १ ते १० क्रमांकाची आणि नर्सरी इयत्तेतील १० कवितांची ओळख तिला आहे. दीड वर्षांची असतानाच तिने हे कौशल्य विकसित केलं असून याबद्दल तिचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रविशाची आई प्रवरा उबाळे या मुंबईतील रुईया महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका आहेत. तर वडील विशाल उबाळे हे IDBI बँकेत कार्यरत आहेत. ओह माय गॉड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दिनेश गुप्ता यांनी स्वतःच्या स्वाक्षरीचं पत्र प्रविशाला देत तिचा सन्मान केला आहे. २३ मे २०२१ रोजी त्यांनी हे पत्र तिला सुपूर्द केलं आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment