भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत – चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजी राजे आक्रमक झाले असून मराठा आरक्षणासाठी तेच सर्वाधिक पुढाकार घेत आहेत. मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी संभाजीराजे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून भाजप सोबतची त्यांची नाळ तुटू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली पण संभाजी छत्रपतींना मोदींनी भेट दिलेली नाही. त्यावर खुद्द संभाजी छत्रपतींनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत,” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ठत्यांचा केलेला सन्मान आणि किती कामे मार्गी लावली हे बहुदा इतरांना माहित नाही,” असंही पाटील म्हणाले. संभाजीराजेंनी ४ वेळा भेट मागण्याच्या आधी ४० वेळा मोदींजीसोबत त्यांची भेट झाली आहे. राजे भेट मागतात मोदीजी भेट द्यायचे. कोविड पराकोटीला गेला आहे आणि ज्यासाठी ते भेट मागत आहे, तो विषय केंद्राचा नसून राज्याचा आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा सुद्धा देईन अस वक्तव्य संभाजीराजे यांनी केलं होतं. त्यांचं हे विधान भाजपविरोधी म्हणून पाहिलं जातं आहे. तेव्हापासूनच भाजप आणि संभाजी छत्रपती यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरु झालीय. चंद्रकांत पाटील यांनीही संभाजीराजे व्यक्ती म्हणून काय करतात त्याचं त्यांना स्वातंत्र्य असल्याचं म्हणाले. आमच्याकडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणार नाही एवढच नाही तर नेतृत्व करणाऱ्यासोबत पक्ष झेंडा बाजुला ठेऊन आम्ही सहभागी होणार असही पाटलांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment