मध्य रेल्वेच्या प्रवाशांकरिता महत्वाची बातमी ; CSMT च्या 20 जलद लोकल दादरवरून धावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबईमध्ये लोकल ही अत्यंत महत्त्वाची असून लोकल द्वारे प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. अनेकदा लोकलच्या प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. एवढेच नाही तर लोकल थांबलेल्या वेळेत प्रवाशांना साधं चढता सुद्धा येत नाही. मात्र आता मुंबईच्या लोकल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडीशी दिलासा देणारे बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी हा दिलासा आहे कारण 5 ऑक्टोबर पासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत असून नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी वरून अप आणि डाऊन वीस जलद लोकल फेऱ्या दादर वरून धावणार आहेत. खरंतर सीएसएमटी दादर स्थानकातील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी सीएसएमटीवरील 20 अप आणि डाऊन लोकल दादर वरून धावणार आहेत त्यामुळे गर्दी पासून थोडीशी सुटका लोकलच्या प्रवाशांना मिळणार अशी आशा ठेवायला काही हरकत नाही.

दादर येथील गर्दी विभाजित होणार

लोकलचा प्रवाशांना अक्षरशः धक्के खात प्रवास करावा लागतो. त्यामुळे गर्दीमध्ये देखील व्यवस्थित प्रवास करता यावा यासाठी काही प्रवासी लोकलमध्ये बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी दादर भायखळावरून सीएसएमटी गाठून प्रवासी पुन्हा कल्याण उद्देशेकडील प्रवास करतात. या प्रवाशांचा विचार करूनच आता दादर वरून जलद लोकल सोडण्यात येणार आहे. सीएसएमटी वरून 254 जलद लोकल धावतात. त्यातील अनेक लोकल पुरेसे फलाट नसल्याने उशिरा धावतात. तेसच सिग्नलमुळे सीएसएमटी दादर दरम्यान अनेक लोकल बऱ्याच वेळा उभ्या असतात याच समस्येचे निराकरण करण्यासाठी असेच सिग्नलमुळे लोकल सीएसएमटी ऐवजी दादर वरून धावणार आहेत. त्यामुळे लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यास मदत होणार आहे. याबरोबरच दादर येथील गर्दी सुद्धा विभाजित होणार आहे असा विश्वास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

मुंबई मधलं दादर हे रेल्वे स्थानक गर्दीच्या स्थानकांपैकी एक आहे. दादर मधून जवळपास 3 जास्त प्रवाशांचा प्रवास होत असतो याबरोबरच मध्य आणि पश्चिम रेल्वेला दादर स्थानक जोडलेले असल्यामुळे प्रवासी दादर मधून गाडी बदलतात. हा सगळा विचार करून प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी प्रवासी दादर स्थानक गाठतात.

नवं वेळापत्रक 5 ऑक्टोबर पासून

दादर रेल्वे स्थानकातल्या फलट क्रमांक ८ चे रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. तर फलट क्रमांक १० आणि ११ चे डबल डिस्चार्ज फलटात रूपांतर करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकलच्या पूर्व पश्चिम दोन्ही बाजूने चढता- उतरता येणार आहे. या दृष्टीकोनातून जलद लोकल दादर वरून सोडण्यात येणार आहे. नवं वेळापत्रक 5 ऑक्टोबर पासून लागू होणार असून त्यानुसार मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातून दहा अप आणि दहा डाऊन अशा लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यास मदत मिळणार आहे.