कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडमधील राजश्री हाॅस्पीटल व एरम हाॅस्पीटल या सोबत अन्य ठिकाणीही ऑक्सिजन कमी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांना ही माहिती समजली. तेव्हा सामाजिक संस्थानी शहरातील सर्व ऑक्सिजन मशीन हाॅस्पीटलमध्ये देवून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. शहरात दोन हाॅस्पीटलांना 20 ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या आहेत.
कराड शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आहेत. बेड, रेमडिसीवर इंजेक्शनसाठी मोठी पळापळ करावी लागत आहे. अशातच आता शहरातील हाॅस्पीटलमध्ये ऑक्सिजन कमी पडू लागल्याचे दिसून येवू लागले आहे. जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. तेव्हा शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, मनसेचे सागर बर्गे, रणजित पाटील, गणेश पवार, सादिक मुल्ला, रयत संघटनेचे विजयकुमार मोटेकर यांच्यासह अनेकांनी आपल्या मशीन देवून सहकार्य केले आहे.
कराड शहरात सामाजिक संस्थानी दिलेल्या मशीनमुळे रूग्णांना दिलासा मिळाला आहे. आता आम्हांला माहिती मिळताच सामाजिक संस्थानी ऑक्सिजन पुरवठा केला आहे. अजूनही आमच्या बाजूने सहाय्य करणार आहोत. तरी प्रशासनानेही या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी मागणी सागर बर्गे यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा