कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
महाराष्ट्र राज्य परीक्षा तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत कराड येथील नगरपरिषद शाळा क्र. 3 मधील मंथन थोरात याने राज्यात गुणवत्ता यादीत दुसरा तर अवनीश सुर्यवंशी याने 5 वा येण्याचा बहुमान मिळविला आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत शाळेचे 20 विद्यार्थी चमकले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनिषा इंगवले, उपमुख्याध्यापिका जयश्री जाधव, पर्यवेक्षक संग्राम गाढवे, सुषमा गरूड व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक वर्ग उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शालेय समितीच्या सदस्यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक अर्जुन कोळी म्हणाले, राज्यातील 5 लाखाहून अधिक विद्यार्थ्याच्यातून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. कराड शहरासाठी व शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. सर्व शिक्षक कर्मचारी व मार्गदर्शक यांच्यामुळे हे यश मिळाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्याचे नांव व गुण, क्रमांक पुढीलप्रमाणे ः- मंथन महेंद्र थोरात- 294 (राज्यात 2रा), अवनिश अनिल सुर्यवंशी- 288 (राज्यात 5वा), स्वामिनी किरण देशमुख- 278 (जिल्ह्यात 28), माही महेश जाधव- 278 (29), देवेश प्रविण कुंभार- 274 (46), वरदराज विनायक कदम- 268 (67), अद्वैता दिपक भिसे- 268 (68), शाकिब अमजतखान मुजावर- 266 (82), अहद जहिरअब्बास शेख -266 (87), मधुरा सचिन पाटील- 260 (106), सई संतोष रसाळ- 260 (114), आयुष नितिन जाधव- 258 (120), शारिया फिरोज पटेल- 258(123), विराज राजाराम बजुगडे- 258(128), अनुष्का जालिंदर देसाई- 254(146), संचिता शंकर हुलवान- 254(150), अक्षरा विवेक सुर्यवंशी- 252 (159), आर्यन संतोष पवार- 250 (168), हेमंत प्रविण पाटील- 250 (171), अनय दादासो नांगरे- 246 (192).