औरंगाबाद | आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पुंडलीकनगर भागातील हनुमान नगर येथे बेडरूम मध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेत एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
पूजा अमोल त्रिभुवन वय-20 वर्षे (रा.गल्ली क्र-3 हनुमाननगर, पुंडलिकनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दुपारपर्यंत मिळालेली अधिक माहिती अशी की, नित्य प्रमाणे पूजा रात्री झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेली होती. परंतु रोज सकाळी लवकर उठणारी पूजा साडेसात वाजले तरी उठली नसल्याने घरच्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.यामुळे नातेवाईकांनी बेडरूमच्या फटीतून डोकावले असता पूजाने छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.
यानंतर तातडीने बेडरूम उघडत पुजाला फासावरून खाली उतरवत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो पर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास साह्ययक निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहेत. उमेदीच्या वयात पूजाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.