खळबळजनक! हळदीच्या कार्यक्रमातून 200 जणांना विषबाधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या आठवड्यामध्येच बुलढाण्यात महाप्रसादातून 500 पेक्षा अधिक जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये (Ahmednagar) 200 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. हळदीच्या एका कार्यक्रमातून ही विषबाधा झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आता या सर्वांवर खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना हळदीचा कार्यक्रमांमध्ये लोकांना जुलाब आणि उलटीचा त्रास व्हायला सुरुवात झाल्यानंतर उघडकीस आली आहे.

हळदीचा कार्यक्रमातून विषबाधा…

समोर आलेल्या माहितीनुसार, अकोला तालुक्यातील मवेशी करवंदरा याठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे. करवंदरा गावात नवरदेवाच्या घरी हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या हळदीला कार्यक्रमांमध्ये 200 पेक्षा अधिक लोकांनी जेवण केले. मात्र जेवण झाल्यानंतर त्यांना उलट्यांचा आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे लगेच या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. तर काहीजणांना ग्रामीण रुग्णालयात हरवण्यात आले. महत्वाचे म्हणजे, विषबाधा झालेल्या लोकांमध्ये सात बालकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गावातील लोकांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच माजी आमदार वैभवराव पिचड आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर पिचड यांनी सर्व रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात यावे अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. आता विषबाधा झालेल्या अनेक लोकांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. तर ज्या व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर अजूनही उपचार प्रक्रिया सुरू आहे. त्या दुसऱ्या बाजूला पोलीस हा सर्व प्रकार कसा घडला याचा शोध घेत आहेत.