नवी दिल्ली । लहान आणि सीमांत शेतकर्यांना लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारने (Modi Government) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. या योजनेंतर्गत दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपयांची (DBT) ट्रान्सफर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केली जाते. आतापर्यंत 7 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. आता 8 वा हप्ताही लवकरच या योजनेंतर्गत खात्यात पोहोचणार आहे. यासाठीची सर्व माहिती pmkisan.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. चला तर मग आपले नाव या लिस्टमध्ये आहे की नाही हे जाणून घेउयात …
लिस्टमध्ये नाव कसे तपासायचे ?
आपण देखील शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल आपल्याला पहिले रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशननंतर आपल्या गावात कोणाकोणाला 2000 रूपये मिळाले आहेत हे आपणास जाणून घ्यायचे असेल तर त्याची लिस्ट पाहणे खूप सोपे आहे. आपण घर बसल्या संपूर्ण गावातील लाभार्थ्यांची लिस्ट पाहू शकता. यासाठी सर्व प्रथम आपल्याला पंतप्रधान किसान सन्मान निधीची अधिकृत वेबसाइट https://pmksan.gov.in/ येथे भेट द्यावी लागेल. यानंतर,मेन पेजवर जाऊन Farmers Corner च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेटससमोर काय लिहिले आहे ते जाणून घ्या
– जर आपल्या आठव्या हप्त्याच्या स्टेटसमध्ये Waiting for approval by state असे लिहिले गेले असेल तर आपल्याला आता आठव्या हप्त्यासाठी थोडा थांबावा लागेल. राज्य सरकारची परवानगी होताच 2000 रुपये तुमच्या खात्यात येतील.
– जर स्टेटसमध्ये Rft Signed by State Government असे लिहिले गेले असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, लाभार्थ्यांचा डेटा तपासला गेला आहे, त्यानंतर राज्य सरकार केंद्राला लाभार्थ्याच्या खात्यात पैसे पाठविण्याची विनंती करते.
– जर स्टेटसमध्ये FTO is Generated and Payment confirmation is pending असे लिहिले गेले असेल तर याचा अर्थ असा आहे की, लवकरच आपला हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
या क्रमांकावर माहिती मिळवा
पीएम किसान हेल्पलाईन – 155261
पंतप्रधान किसान टोल फ्री – 1800115526
पंतप्रधान किसान लँड लाइन क्रमांक: 011-23381092, 23382401
याशिवाय एखादी व्यक्ती [email protected] या मेल आयडीवरही ईमेल करू शकते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा