नवी दिल्ली । वैद्यकशास्त्रातील यावर्षीचा म्हणजे वर्ष 2020 चा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला आहे. हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या तिन्ही शास्त्रज्ञांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे.
हा पुरस्कार जाहीर करताना नोबेल समितीने म्हटलं की, “या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे इतिहासात प्रथमच, हिपॅटायटीस सी विषाणूंमुळे होणारे आजार आता बरे होऊ शकतात. मानवजातीसाठी वरदान ठरलेल्या या संशोधनामुळे यासंबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणे शक्य झाले तसेच लाखो लोकांचे जीवन वाचविणारी नवीन औषधेही तयार केली गेली.”
BREAKING NEWS:
The 2020 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded jointly to Harvey J. Alter, Michael Houghton and Charles M. Rice “for the discovery of Hepatitis C virus.” pic.twitter.com/MDHPmbiFmS— The Nobel Prize (@NobelPrize) October 5, 2020
नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.