दिल्ली कॅपिटल्सला धक्का ; बोटाच्या दुखापतीमुळे अमित मिश्राची आयपीएल मधून माघार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. दिल्लीच्या संघात युवा खेळाडूंचा आणि दिग्गजांचा योग्य समतोल दिसून येतोय. परंतू आता दिल्लीच्या संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा बोटाला झालेल्या दुखापतीमुळे उरलेला संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. शनिवारी शारजात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यात खेळत असताना अमित मिश्राच्या बोटाला दुखापत झाली होती.

ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना दिल्ली कॅपिटल्समधील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “कोलकात्याविरुद्ध सामन्यात अमितच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर त्याचं स्कॅनिंग करण्यात आलं होतं. ज्याचा रिपोर्ट आला असून मिश्राला झालेली दुखापत गंभीर असल्याचं समोर आलंय. तो यापुढच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. अस ते म्हणाले.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अमित मिश्रा फॉर्मात येत असतानाच त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागत आहे. त्याचा अनुभव संघातील इतर गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरायचा.” कोलकात्याविरुद्ध सामन्यातही अमित मिश्राने शुबमन गिलची विकेट घेतली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like