हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून या ठिकाणी पाच वर्षीय चिमुकलीवर 21 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चिमुकलीवर अत्याचार करून उत्तर प्रदेशला पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित पाच वर्षांची चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत होती. ती घरासमोर एकटी खेळत असल्याचे आरोपीने पाहिले. याचीच ही संधी साधून आरोपीने चिमुकलीला आपल्या घरात बोलावून नेले. त्यानंतर त्याने चिमुकलीवर अत्याचार केला.
पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्वेमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संबंधित आरोपी उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच बोईसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.