पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. पुण्यातही रुग्णसंख्या वाढते आहे. त्यातच आज पुण्यातील २२२ रुग्ण गंभीर असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून सांगितले आहे. पुणे जिल्ह्यात काही परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.
पुणे शहरात सध्या २ हजार ७३३ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी २२२ रुग्ण गंभीर आहेत. त्यामधील ४९ रुग्ण हे व्हेंटिलेटर वर आहेत तर १७३ रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. मुंबईपाठोपाठ सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात सापडले आहेत. जिल्ह्यात ५ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचा आकडा हा चिंतादायक आहे. जिल्ह्यातील संक्रमण रोखण्यासाठी सामाजिक अलगाव चे नियम पाळले जात आहेत. जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपीही यशस्वीरीत्या झाली आहे.