पानिपत । भारतात महिला अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरदिवशी महिलांवरील अत्याचाराच्या भयावह आणि घृणास्पद घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना हरयाणातील पानिपतमध्ये घडली आहे. एका खासगी रुग्णालयामधील आयसीयूत उपचार घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर दोन कर्मचाऱ्यांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ जानेवारीला पीडित मुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे तिच्यावर रुग्णालयातील आयसीयूत उपचार सुरु झाले. दरम्यान, २६ जानेवारीला रात्री रुग्णालयातील एक कर्मचारी सुट्टी झाल्यानंतरही घरी गेला नाही. तो आयसीयूतच थांबला. त्यानंतर काही वेळाने दुसरा कर्मचारी देखील तिथे गेला. दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. सकाळी रुग्णालयात गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक आरोपी बेडभोवती पडदा लावत असून, तो जवळपास एक तास तरुणीसोबत असल्याचे दिसते. त्यानंतर काही वेळाने दुसरा आरोपीही तिथे गेला. तो देखील जवळपास एक तास मुलीसोबत होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’