हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रवास म्हंटल की आपल्याला आठवते ती ST महामंडळाची लालपरी. लालपरीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यातल्यात्यात ग्रामीण भागात ही लालपरी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे याबाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र्र एसटी महामंडळाने 2,200 नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवासाचा वेग सुसाट होणार असल्याचे बोलले जात आहे. या नवीन गाड्या मार्च 2024 पर्यंत महामंडळाच्या ताफ्यात समाविष्टीत होणार आहेत. त्यासाठी त्यांनी तश्या ऑनलाईन निविदा काढल्या आहेत.
ST च्या विविध सुविधेमुळे घेतला निर्णय
ST महामंडळाने महिलांना 50 टक्के आरक्षण दिले तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवास फुकट करण्यात आला. या निर्णयामुळे प्रवश्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि गाड्याची कमतरता भासायला लागली. त्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेत प्रवाश्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सध्या एसटी महामंडळात एकूण 16 हजार बस उपलब्ध आहेत. त्यातील 12 हजार या साध्या बस आहेत. 2023-24 च्या अर्थसंकल्पात सरकारने डिझेलवरील साध्या बस देऊ करून 900 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
ऑलेक्ट्रॉ कंपनीला देण्यात आले कंत्राट
ST महामंडळाने 5,200 एसी इलेक्ट्रिक बस बांधणीचे कंत्राट हे ऑलेक्ट्रॉ कंपनीला दिले आहे. त्यामुळे प्रोटोटाईप इलेक्ट्रिक बसची तपासणी चाचणी पूर्ण झाल्यानंतर या सर्व्ह बस ताफ्यात सामील होणार आहेत. या बस नऊ मीटरच्या असणार आहेत. जानेवारी 2024 च्या शेवटापर्यंत या गाड्या महामंडळात सामील होतील. असे सांगण्यात आले आहे.