हैदराबाद : वृत्तसंस्था – देशात सध्या मोठ्या प्रमाणात आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. लोक एका छोट्याशा कारणावरून आत्महत्या (suicide) करत आहेत. नैराश्यामुळे अनेक तरुणाई, नागरिक आत्महत्येसारखे (suicide) टोकाचे पाऊल उचलत आहे. अशीच एक घटना 23 वर्षीय युट्यूबरच्या बाबतीत घडली आहे. या आत्महत्या (suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव सी धीना असे आहे. त्याचे SELFLO नावाचे यूट्यूब चॅनेल होते. त्या युट्यूब चॅनेलवर सी धीना याने लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
सी धीना नावाच्या एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या (suicide) केली. तो युट्यूबर होता. तसेच ग्वाल्हेर येथील IIIT मध्ये शिक्षण घेत होता. त्याने तीन मजली इमारतीवरुन उडी मारून सुसाईड केली आहे. त्याचे सेल्फलो (SELFLO) नावाचे युट्यूब चॅनेल होते. ज्यामध्ये त्याने आत्महत्या करण्याअगोदर एक सुसाइड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये तो नैराश्यात होता. तसेच त्याला योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यास आईवडील अपयशी ठरल्याचे त्याने लिहिले आहे.
हैदराबादमधील सैदाबाद पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या क्रांतीनगर कॉलनीत गुरुवारी ही घटना घडली आहे. दीना आयआयटी ग्वाल्हेरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तो सेल्फफ्लो नावाचे यूट्यूब चॅनेल चालवत होता. काही काळापासून त्याचे युट्यूबवर स्बस्क्रायबर वाढत नव्हते म्हणून तो तणावात होता. तशी व्यथा त्याने यूट्यूबवर शेअर केली होती. याच तणावातून त्याने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 174 अन्वये संशयास्पद मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर