सातारा जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 234 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 416 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 10 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तर 234 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 2 (9814), कराड 61 (37866), खंडाळा 12 (13822), खटाव 69 (24265), कोरेगांव 32 (20990), माण 48 (16863), महाबळेश्वर 2 (4587), पाटण 7 (9948), फलटण 107 (34822), सातारा 64 (49268), वाई 7 (15352) व इतर 5 (1901) असे आज अखेर एकूण 239508 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे

कराड 4, माण 1, फलटण 1, सातारा 1, वाई 3 अशी असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6 हजार 22 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज मंगळवार संध्याकाळपर्यंत 234 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात आजपर्यंतची स्थिती

जिल्ह्यात आजपर्यंत 17 लाख 97 हजार 608 नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 लाख 39 हजार 508 बाधित झाले आहेत. त्यापैकी 2 लाख 27 हजार 141 जणांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण बाधितांपैकी 6 हजार 22 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर सध्या 9 हजार 711 उपचारार्थ रुग्ण आहेत.

Leave a Comment