हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. कारण आता वंचितने चारपैकी दोन जागा हरणार असल्यामुळे फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळेच आता महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) वंचित (VBA) विरोधात एक नवी खेळी खेळली आहे. आघाडीने वंचितला 24 तासांची मुदत दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही काय ते सांगा ? असा थेट संदेश आघाडीकडून वंचितला देण्यात आला आहे. त्यामुळे वंचितने आघाडीचे ऐकले नाही तर आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात येईल.
खरे तर गेल्या निवडणुकीच्यावेळी वंचित आघाडी वेगळी लढल्यामुळे काँग्रेसच्या बऱ्याच जागा हातातून गेल्या होत्या. परंतु याचा फायदा शिवसेना आणि भाजपला झाला होता. त्यामुळेच यावेळी आता वंचितलासोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. मात्र या सगळ्यात वंचितने आघाडीकडून देण्यात आलेल्या चार पैकी दोन जागा नाकारल्या आहेत. त्यामुळेच आज संध्याकाळपर्यंत वंचितने आपला काय तो निर्णय कळवावा , असे आघाडीकडून सांगण्यात आले आहे.
मुख्य म्हणजे, आघाडीकडून देण्यात आलेल्या वेळेच्या आत वंचितने काहीही कळवले नाही तर उद्यापर्यंत महाविकास आघाडी आपले उमेदवार जाहीर करू शकते. सांगितले जात आहे की, आघाडीच्या जागांसाठी काँग्रेस-शिवसेना आणि शरद पवार गटाने आपला ठेवला आहे. यामध्ये वंचितने देखील स्वातंत्र्य लढण्याची तयारी दाखवली आहे. यात दोन्ही बाजूंनी आघाडी झाली नाही तर त्याचा थेट फायदा भाजप आणि शिंदे गटाला होईल. परंतु भाजपने हाच फायदा घेऊ नये म्हणून आघाडी वंचितला मनवताना दिसत आहे.