धक्कादायक!!! अमरावतीत पंचवीस किलो जिलेटिन सह स्फोटके सापडली ; परिसरात खळबळ

amravti gilletin
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल पंचवीस किलो जिलेटिन कांडय़ा पोलिसांनी जप्त केले आहे . तर त्याचबरोबर जवळपास दोनशे नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. सदर प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे तर सदर २०० नग जिलेटिन व २०० नग डिटोनेटर चा वापर कशासाठी व कुणाच्या सांगण्यामुळे करण्यात येत होता याचे कोडे मात्र अजून उलगडलेले नाही.

ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने एका आरोपीला अटक केलेली आहे तर या प्रकरणातील दोन आरोपी मात्र फरार झालेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये काल एक युवक संशयितरीत्या अतीषय वेगाने जात असताना त्याच्याजवळ कदाचित दारू असावी असा संशय पोलिसांना आला. पण त्याचा पाठलाग केला असता सदर आरोपींनी त्याच्याजवळील जिलेटिन व डेटोनेटर नी भरलेली बॅग सोडून पळ काढला .

पळालेल्या युवकाचा संदर्भात माहिती घेतल्यानंतर सदर युवक हा सुमीत अनिल सोनवणे राहणार सातरगाव तिवसा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले .पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने पंचवीस किलो स्फोटके डिटोनेटर हे अंकुश लांडगे करजगाव लोणी याला विकल्याची कबुली दिली .

पोलिसांनी अंकुश लांडगे कडे मोर्चा वढवीताच त्याची चाहूल आरोपीला लागली आरोपी घटनास्थळावरून पसार झालेत . पोलिसांनी सदर ठिकाणावरून दोन शे नग जिलेटिन व दोनशे नग डिटोनेटर हस्तगत केलेली आहेत. मात्र ही जिलेटिन व डिटोनेटर स्फोटके नेमके कशासाठी व कुणाच्या आदेशाने आणण्यात आली याचा तपास आता तीवसा पोलिस करत आहेत .

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group