हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडच्या शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर आता नागपूरमधील एका शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांत 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील 16 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत तर 9 रुग्ण हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यातील आहेत. मुख्य म्हणजे यातील 25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आल्यामुळे 25 रुग्णांना मृत्यु झाला आहे.
या सर्व घटनेवर रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की, खाजगी रुग्णालय आपल्या मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी शेवट शासनाला व्हेंटिलेटरवरचे रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवून देतात. शासकीय रुग्णालय असल्यामुळे सर्व रुग्णांना ऍडमिट करून घ्यावेच लागते. 25 पैकी 12 रुग्णांना देखील शेवटच्या क्षणाला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यामध्ये आठ रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातील आणि चार रुग्ण इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील होते. मृत झालेल्या 25 रुग्णांमध्ये काही बालकांचा देखील समावेश होता.
दरम्यान, गेल्या 2 ऑक्टोंबरपासून नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता नागपूरमध्ये 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही घटनांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. औषधांचा अपुरा तुटवडा आणि प्रशासन यंत्रणेच्या कमतेरतेमुळं यारुग्णांवर आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या घटनांमधून तरी जागे होत प्रशासन आरोग्य विभागाकडे नीट लक्ष देईल का हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.