औरंगाबाद : सिडको एन-4 या भागात राहणाऱ्या 29 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रोजी रात्री उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा महेश भंडारी (वय २९) रा. एन-4 सिडको असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मनीषा यांचे पती एका बँकेत नोकरीला असून त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. मनीषा यांनी शनिवार रात्री करा वाजता घरातील स्टोर रूममध्ये छताच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान, ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मनीषा यांनी घराघुती कारणातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एन. शेख हे करीत आहे.