हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या पहिला कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) PM आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे. ही बैठक नवी दिल्ली येथील पीएम हाऊसमध्ये पार पडली. या बैठकीला अमित शाह, सर्बानंद सोनोवाल, राजनाथ सिंह, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह, ललन सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती.
मोदी सरकारच्या पहिल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे की, सर्वसामान्य नागरिकांसाठी PM आवास योजनेतंर्गत 3 कोटी घरे बांधली जातील. या घरांची उभारणी शहरी अनेक ग्रामीण भागात केली जाईल. बांधण्यात आलेल्या या घरांमध्ये कनेक्शन, वीज कनेक्शन आणि नळ कनेक्शन देण्यात येईल. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला आणि हक्काचे घर असावे हे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, PM आवास योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेला कायमस्वरूपी घरे देण्याच्या सरकारच्या उद्दिष्टांतर्गत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी योजनेअंतर्गत मार्च 2024 पर्यंत 2.95 कोटी घरे बांधली जातील, असे सांगण्यात आले होते. यातील काही घरांचे काम अजूनही शिल्लक आहे. तर 2023 पर्यंत 2.61 कोटी घरे बांधली गेली होती. आता पुन्हा एकदा सरकारने या योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधली जातील असे आश्वासन दिले आहे.