हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – फेडरल बँकेनं ग्राहकांसाठी नवीन प्रकारचे क्रेडिट कार्ड (credit card) लाँच केले आहे. ग्रुप क्रेडिट शील्ड असे या क्रेडिट कार्डाचे (credit card) नाव आहे. यामध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची सुविधा म्हणजे मोफत जीवन विमा. हे क्रेडिट कार्ड (credit card) घेणाऱ्या व्यक्तीला 3 लाख रुपयांचं मोफत जीवन विमा संरक्षण मिळणार आहे. म्हणजेच कार्डधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला कव्हर म्हणून 3 लाख रुपये मिळतील. तसेच या कार्डवर ग्राहकाला 3 लाख रुपयांपर्यंतची क्रेडिट लिमिट देण्यात आली आहे.
क्रेडिट कार्ड वैशिष्ट्ये-
या क्रेडिट कार्डच्या (credit card) इतर वैशिष्ट्यांमध्ये कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा वैद्यकीय तपासणीशिवाय सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ असा की हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आणि त्यावर उपलब्ध असलेले जीवन विमा संरक्षण घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. क्रेडिट कार्डची ही विशेष सेवा पूर्ण सुरक्षेसह प्रदान केली जात असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
फेडरल बँक सध्या तीन क्रेडिट कार्ड (credit card) प्रकार ऑफर करते ज्यात सेलेस्टा, इम्पेरियो आणि सिग्नेट यांचा समावेश आहे. ही तीन कार्ड अनुक्रमे Visa, MasterCard आणि RuPay नेटवर्कवर ऑपरेट केली जातात. तसेच क्रेडिट कार्डधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास, कुटुंबातील सदस्य कर्जाची रक्कम परत करण्याची गरज भासणार नाही, कारण 3 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण दिले जाणार आहे. या क्रेडिट कार्डच्या मदतीने फेडरल बँक आपले ग्राहक वाढवण्यावर भर देईल.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय