हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 3 New Municipalities In Pune । उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यात हिंजवडी, चाकण आणि उरुळी देवाची – फुरसुंगी – मांजरी अशा ३ नव्या महापालिका होणार आहे अशी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली. आज सकासकाळी अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. या पाहणीवेळी त्यांनी नव्या महापालिका निर्मितीबाबत माहिती दिली.
खरं तर मागच्या काही वर्षांपासून पुणेकरांना मोठ्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हिंजवडी, चाकण हे आयटी आणि ऑटो हब तर या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले आहेत. येथील अनधिकृत बांधकामे, वाहतुकीचा उडालेला बोजवारा यासाठी तेथील ग्राम पंचायती एवढ्या सक्षम नाहीत. यामुळे पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याची माहिती (3 New Municipalities In Pune) अजित पवार यांनी केली आहे. चाकण एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. त्यांची कोंडी फोडावी लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येला घेऊन आज प्रत्यक्ष चाकण येथे विविध ठिकाणी पाहणी केली. या पाहणीवेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. वाहतूक कोंडी होण्याची प्रमुख कारणं… pic.twitter.com/fsnT4qp6U9
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 8, 2025
कोणाला आवडो किंवा न आवडो, पण मी हे करणारच- 3 New Municipalities In Pune
अजित पवार म्हणाले, आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे. त्यासाठीही मी निधी सुद्धा देतोय. त्यानंतर आपण पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग बनवू. तसेच आपल्याला पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या (3 New Municipalities In Pune) लागणार आहेत. एक म्हणजे चाकण, दुसरी हिंजवडी येथे आणि तिसरी महापालिका , मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात करावी लागणार आहे. कोणाला आवडो किंवा न आवडो, पण मी हे करणारच आहे असं अजित पवार यांनी म्हंटल.




