सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ३ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सदर मुलाचा कोरोना अहवाल आज प्राप्त झाला असून तो पोझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची सख्या आता १८ वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, कोरोना अहवाल पोझिटिव्ह आलेला ३ वर्षांचा मुलगा कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच आज क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या एका अनुमानित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 1, बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आलेले 2 व सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 9 तर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 4, सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित 24 व उपजिल्हा जिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाचा निकट सहवासित 1 अशा एकूण 41 जणांना अनुमानित म्हणून आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या 41 अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला WhatsApp ला Join व्हा आणि Facebook पेज Like करा