300 Days PNB FD Scheme | आजकाल अनेक लोक आपल्या भविष्याचा विचार करून आर्थिक गुंतवणूक करत असतात. अनेक लोक एफडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करत असतात. कारण एफडी ही सुरक्षित असते आणि त्याचा परतावा देखील खूप चांगला मिळतो. आपल्या देशात अशा अनेक बँक आहेत ज्या एफडीसाठी खूप चांगला व्याजदर देतात. त्यात पंजाब नॅशनल बँकेचा देखील समावेश आहे. पंजाब नॅशनल बँक (300 Days PNB FD Scheme) ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. आपल्या देशात एकूण 15 पीएसबी आहेत आणि त्यात नॅशनल पंजाब नॅशनल बँकेचा देखील समावेश होतो.
ही पंजाब नॅशनल बँक देखील आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक विविध योजना राबवत असते. 7 दिवसापासून ते तब्बल 10 वर्ष कालावधीच्या एफडी योजना या बँकेकडून ग्राहकांना दिल्या जातात. आज आपण या पंजाब नॅशनल बँकेच्या अशा एका एफडी योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यातून गुंतवणूकदाराला खूप चांगला परतावा देखील मिळतो. पंजाब नॅशनल बँकेची ही 300 दिवसांची एफडी योजना आहे याची खासियत आपण पाहणार आहोत.
कशी आहे 300 दिवसाची एफडी योजना? | 300 Days PNB FD Scheme
ग्राहकांसाठी पंजाब नॅशनल बँकेने आता नवीन 300 दिवसाची एफडी योजना काढलेली आहे. या एफडीवर ग्राहकांना खूप चांगले व्याज देखील मिळते. या 300 दिवसाच्या एफडीवर (300 Days PNB FD Scheme) बँकेकडून ग्राहकांना 7.10% दराने व्याज दिले जाते.
पंजाब नॅशनल बँकेच्या (300 Days PNB FD Scheme) या 300 दिवसाच्या एफडी योजनेमध्ये जर ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 0. 50 टक्के अधिक व्याजदर मिळतो. अर्थातच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेच्या गुंतवणूक नक्कीच 7.60 टक्के दराने व्याज दिले जाते. तसेच सीनियर सिटीजन नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना 7.90% दराने व्याज मिळते.
सामान्य ग्राहकाचे व्याजदर
एका सामान्य ग्राहकाने जर या योजनेमध्ये 300 दिवसांच्या एफडीवर 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 300 दिवसानंतर त्या ग्राहकाला 17,506. 85 एवढे व्याज मिळणार आहे.
जेष्ठ नागरिकांना व्याजदर | 300 Days PNB FD Scheme
त्याचप्रमाणे जर ज्येष्ठ नागरिकांनी पंजाब नॅशनल बँकेच्या (300 Days PNB FD Scheme) या 300 दिवसाच्या खास एफडी योजनेमध्ये तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर त्यांना 3 लाख18, 739.73 एवढे पैसे मिळतील. म्हणजेच त्यांना 18739, 73 एवढे व्याज मिळेल.
सुपर सिटीजन नागरिकांना व्याजदर
या योजनेमध्ये सुपर सिटीजन नागरिकांनी 3 लाख रुपये गुंतवले तर त्यांना मॅच्युरिटीवर 3 लाख 19 हजार 479 45 रुपये मिळतील. म्हणजेच त्यांना 19479.79 एवढे व्याज मिळणार आहे. ही योजना सगळ्यांसाठीच खूप फायद्याची आहे. त्यामुळे तुम्ही जर एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेमध्ये गुंतवणूक करून खूप चांगला परतावा मिळवू शकता.