औरंगाबाद | गेल्या 24 तासात दिवसभरात कोरोनाच्या 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 9, तर ग्रामीण भागातील 24 रुग्णांचा समावेश असुन 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा आटोक्यात आल्याने दिलासा व्यक्त होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या 630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख 46 हजार 334 एवढी झाली आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 270 एवढी आहे. आणि आज पर्यंत 3434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये मंगळवारी 91 कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज 50 पेक्षा जास्त रुग्णांचे निदान होत होते. परंतु ग्रामीण भागात आढळणाऱ्या नव्या रुग्णांची शुक्रवारी घट झाली. आणि रुग्ण संख्या 50 च्या खाली आली. मनपा हद्दीतील रुग्ण मोतीलाल नगर एक इंदिरानगर एक यासह शहरातील विविध भागात सात रुग्ण आढळले. ग्रामीण भागामध्ये बजाजनगर, एमायडीसी वाळूज, दरकवाडी, फुलंब्री, सिल्लोड या ठिकाणी प्रत्येकी एक आणि पैठण 16 केळगाव त्याचबरोबर विविध भागांमध्ये 18 आढळले आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 334 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 42 हजार 270 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील 14 आणि ग्रामीण भागातील 55 अशा 69 कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरु असताना हर्सूल येथील 60 वर्षीय पुरुष तलवाडा वैजापूर येथील 85 वर्षीय महिला वाकडा वैजापूर येथील 65 वर्षीय पुरुष सिरसमाळ येथील 28 पुरुष इमांपुर वाडी नागपुरवाडी पैठण येथील 36 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे.