धक्कादायक! पुण्याच्या जंबो कोव्हिड सेंटरमधून ३३ वर्षीय महिला रुग्ण बेपत्ता

प्रातिनिधीक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । कोव्हिड सेंटरमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यात एक ३३ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला जंबो कोव्हिड सेंटरमधून बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. या महिलेला ससून रुग्णालयातून कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले होते. या रुग्ण महिलेवर उपचार सुरु असल्याचं कोव्हिड सेंटरमधून सुरूवातीला सांगण्यात आलं होतं.

मात्र, बरी झालेल्या महिलेला जंबो कोव्हिड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आईला, ‘तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती’, अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. जंबो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत महिलेच्या आईनं जंबो कोव्हिड सेंटर येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.