नवी दिल्ली । केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल.
या योजनेंतर्गत सरकार कामगारांना पेन्शनची गॅरेंटी देते. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 2 रुपये वाचवून वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळवू शकता. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात …
एका महिन्यात 55 रुपये जमा करावे लागतील
ही योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच दररोज 2 रुपयांपेक्षा कमी. म्हणजेच, 18 व्या वर्षी दररोज सुमारे 2 रुपये वाचवून, तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते.
एक छोटी सी बचत की आदत बुढ़ापे में भी बनाएगी आपको स्वावलंबी
मात्र ₹55 प्रति माह की बचत आपको देगी सुनहरा भविष्य.. आज ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना का लाभ उठाएं। अधिक जानकारी के लिए विजिट करें https://t.co/WrW328nAtN
हेल्पलाइन नंबर 14434#eShram#ShramevJayate @byadavbjp pic.twitter.com/ADH6P5pp10— DGLW (@DGLabourWelfare) November 23, 2021
जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.
‘या’ कागदपत्रांची आवश्यकता असेल
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँकेचे बचत खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अशाप्रकारे करावे लागेल रजिस्ट्रेशन
यासाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे सर्व माहिती ऑनलाइन भारत सरकारकडे जाईल.
ही माहिती देणे आवश्यक आहे
रजिस्ट्रेशनसाठी, तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल. याशिवाय, संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेत देखील द्यावे लागेल, जेणेकरून त्याच्या बँक खात्यातून पेन्शनसाठी वेळेत पैसे कापता येतील.