पहिली ते चौथी शाळा सुरू होणार?? राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत संकेत दिले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात १ ली ते ४ थी साठी शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून सध्या होमवर्क सुरू आहे. शाळा सुरू करण्याबाबत टास्कफोर्सचा हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय घेतील,असे राजेश टोपे यांनी म्हंटल आहे.

पहिली ते चौथी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत याची काळजी घेत त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापनाला तयारी करण्यासाठीच्या चर्चा पूर्ण झाल्या आहेत. तसेच पालकांचेही काऊंसिलिंग करण्याची तयारी आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये शाळा सुरू होण्यासाठी शक्य होईल. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे. असे राजेश टोपे यांनी म्हंटल.

राज्यात नाट्यगृह, सिनेमागृहांना ५० टक्के परवानगीने सुरू टेवण्याचे निर्देश दिल आहेत. सध्या कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहता अशीच स्थिती राहिली तसेच येत्या दिवसात आणखी सुधारणा झाली की हे नियमही शिथिल करण्यात येतील असे राजेश टोपे म्हणाले.

Leave a Comment