हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन डेटिंग ॲपवर (Dating App) जोडीदार शोधण्याची क्रेझ तरुणांमध्ये सध्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेला याच गोष्टीमुळे चार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या महिलेला एका व्यक्तीने डीपफेकचा वापर करून चार कोटींचा गंडा घातला आहे. श्रेया दत्ता असे या महिलेचे नाव असून तुझ्यासोबत ही मोठी घटना घडली आहे. संबंधित आरोपीने श्रेयाला फसवत तिच्याकडून तब्बल 4.50 लाख रुपये उकळले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय महिलेची म्हणजेच श्रेयाची गेल्या काही दिवसांपूर्वी अँसेल नावाच्या व्यक्तीशी डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. अँसेलने त्यावेळी तो मद्य विक्री करणारा व्यापारी असल्याचे श्रेयाला सांगितले होते. पुढे जाऊन या दोघांचे बोलणे वाढले. यातूनच अँसेलने श्रेयाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिला एक क्रिप्टो ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करायला सांगितले. या ॲपमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देखील त्यानेच दिला. अँसेलवर विश्वास ठेवून श्रेयाने तब्बल चार कोटी रुपये गुंतवले. शेवटी चांगली रक्कम जमा झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर अँसेल ही रक्कम घेऊन फरार झाला.
मात्र दुसऱ्या बाजूला अँसेल फरार झाले असे श्रेयाला समजले देखील नाही. ज्यावेळी तिने या ॲपवरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्याकडे वैयक्तिक कराची मागणी केली गेली. त्यामुळे तिने ही गोष्ट आपल्या भावाला सांगितली. जेव्हा तिच्या भावाने अँसेलला इंटरनेटवर सर्च केले तेव्हा तो एक फ्रॉड माणूस असल्याचे या दोघांपुढे आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्रेयाने अँसेल विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच घडलेल्या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे. सध्या पोलीस अँसेलचा आणि या ॲप मागे असलेल्या रॅकेटचा शोध घेत आहेत.