हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Women’s Day) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्र सरकारने महिला दिनाच्या (Womens Day) पार्श्वभूमीवर महिला धोरणांची अंमलबजावणी केली. तसेच महिलांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून अनेक अनेक महत्त्वाचे देखील निर्णय घेतले. त्यानंतर या नव्या धोरणांना सुरुवात शुक्रवारपासून करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महिलांसाठी महत्त्वाचे निर्णय (Women’s Day)
माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितले की, “महिला दिनाला केंद्रस्थानी ठेवून महिलांच्या आरोग्य व पोषण आहारावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. इथून पुढे ग्रामीण शहरी दुर्गम भागातील आणि आदिवासी भागातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यावर भर देण्यात येईल. यासह शिक्षण, कौशल्यासाठी माध्यमिक आणि वरिष्ठ पातळीवरील शाळांमध्ये 100 टक्के नोंदणी होईल आणि ती टिकून राहील, यावरही लक्ष दिले जाईल, पुढील काळात महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल”
इतकेच नव्हे तर, “महिलांबरोबर होणाऱ्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अंतर्गत समितीची स्थापना करण्यात येईल. सध्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींसाठी नेतृत्व, नियोजन, अर्थसंकल्प आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे धोरणात नमूद केले आहे. या धोरणांच्या अंमलबजावणीचा आराखडा ही तयार करण्यात आला आहे. तसे सरकारच्या विविध विभागांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून यामध्ये समन्वय कसा राखला जाईल याची खबरदारी घेण्यात आली आहे” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, वुमन्स डेचे (Women’s Day) औचित्य साधून केंद्र सरकारने गॅस सिलेंडरवर 300 रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी नुकतीच केंद्रासोबत शक्ती विधेयकाबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरच याची देखील घोषणा करण्यात येईल असा अंदाज बांधला जात आहे.