हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी पश्चिम बंगालमधील एका वीटभट्टीवर मोठी दुर्घटना घडली आहे. 24 परगना जिल्ह्यात असणाऱ्या वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट झाल्यामुळे चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसेच, स्फोटामुळे चिमणी कोसळल्यामुळे 30 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. सध्या या सर्व कामगारांवर पश्चिम बंगालमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच चिमणीमध्ये स्फोट कसा झाला याचा पोलीस तपास घेत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, 24 परगना जिल्ह्यात असणाऱ्या वीटभट्टीवर एकूण 60 कामगार काम करीत होते. बुधवारी दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी कामगारांना वीस भट्टीची चिमणी पेटवायची होती. त्यासाठी काही कामगार चिमणी पेटवण्यासाठी गेले. त्याचवेळी अचानक जोरात स्फोट झाल्याचा आवाज आला. यानंतर काही क्षणातच चिमणी कोसळली. या घटनेमुळे काही कामगार मलब्याखाली दबले गेले.
यानंतर स्फोटाची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक प्रयत्नानंतर पोलिसांनी चार कामगारांना मलब्या खालून बाहेर काढले. या सर्व घटनेमुळे चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 30 कामगार गंभीर जखमी झाले. यामुळे जखमी झालेल्या सर्व कामगारांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या या सर्व घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.