सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरातील 40 हजार नागरिकांना पावसाळ्यात देखील शुद्ध पाणी मिळणार आहे. रेल्वे स्टेशन येथे आणि एमआयडीसीत जलशुद्धीकरण केंद्र (फिल्टरेशन प्लांट) उभारण्यात आले असून याद्वारे नागरिकांना आता स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षाचे कोरेगावकरांवरील पाणी संकट दूर झाले आहे.
कोरेगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत कोरेगाव नगर विकास आघाडीची सत्ता आल्यापासून आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा धडाका सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने विकासकामे केली जात आहेत. कोरेगाव शहरांतर्गत रस्त्यांची कामे देखील प्रगतीपथावर सुरू आहेत. कोरेगावचे राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, उनगराध्यक्ष सुनील बर्गे आणि सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
आ. महेश शिंदे म्हणाले, आता केवळ लोकांच्या विकासाचा ध्यास घेवून कोरेगावकरांची सेवा करायची आहे. कोरेगाव शहरातील सत्ता आमच्या हातात दिल्याने जबाबदारी वाढली आहे, मात्र ती पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही काम करू. लोकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास कदापी तुटू देणार नाही. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमचा आहे, त्यामुळे विकासकामे मार्गी लागतील.