4 हजार 849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार; सरकारचा मोठा निर्णय

0
20
farmer news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, तसेच शेतकऱ्यांच्या पड जमिनींबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास परवानगी देण्यात आली.

महत्वाचे म्हणजे, राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना त्यांची ४,८४९ एकर जमीन परत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता, शासन जमा झालेल्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीच्या होणार आहेत. मात्र यासाठी शेतकऱ्यांना रेडीरकनरच्या २५% रक्कम भरावी लागणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम-२२० अंतर्गत आकारी पड जमिनीबाबत असलेल्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे म्हणले जात आहे.