हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅराग्लायडिंग म्हटले कि अनेकांच्या छातीत धडकी भरते. उंच कड्यावरून थेट दरीत उडी मारायचं म्हटलं तर साहजिकच कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मात्र काही हटके लोक असे असतात ज्यांना अशा गोष्टी करायला मजा येते. पॅराग्लायडिंग हा अशाच साहसी लोकांचा खेळ आहे. भारतात देश विदेशातून दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात. तुम्हाला काश्मीरच्या दल सरोवरापासून दक्षिणेच्या केरळातील सुंदर समुद्र किनाऱ्यांबाबत आणि गुजरातच्या कच्छ पासून ते नॉर्थईस्टच्या जंगलपर्यंत सगळी पर्यटनस्थळे बहुदा माहिती असावीत. परंतु आज आम्ही तुम्हाला भारतातही अशा ५ पॅराग्लाईडींगसाठी जगात भारी असणाऱ्या ठिकाणांबाबत माहिती देणार आहोत.
कामशेत, महाराष्ट्र –
महाराष्ट्रात पुणे शहरापासून काही अंतरावर असलेले कामशेत हे पॅराग्लायडिंगसाठी देशात प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर ते जून या कालावधीत तुम्ही येथे पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता. यासोबतच तुम्हाला येथील पश्चिम घाटाचे सौंदर्यही नक्कीच आकर्षित करेल यात वाद नाही. कामशेतला पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रथम पुणे शहरात उतरावे लागेल. यानंतर कामशेतसाठी बस किंवा प्रायव्हेट कार बुक करून तुम्ही कामशेतला जाऊ शकता.
सोलांग व्हॅली, हिमाचल प्रदेश –
हिमाचल प्रदेश हे नेहमीच लोकांचे आवडते पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ राहिले आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक भेट देण्यासाठी येतात. नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले हे हिमाचल आपल्या साहसांसाठीही खुप प्रसिद्ध आहे. पॅराग्लायडिंगसाठी तुम्ही सोलांग व्हॅलीला जाऊ शकता. ऑक्टोबर ते जून या कालावधीत तुम्ही येथे पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता.
बीर-बिलिंग, हिमाचल प्रदेश –
भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाण हे हिमाचल प्रदेशमध्ये स्थित बीर-बिलिंग हे पॅराग्लायडिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तुमचे मन जिंकेल. कांगडा व्हॅलीमध्ये स्थित पॅराग्लायडिंग उत्साही लोकांसाठी योग्य ठरेल. ऑक्टोबर ते जूनमध्ये येथे पॅराग्लायडिंग तुम्ही करू शकता.
पवना, महाराष्ट्र –
महाराष्ट्रातील पवना हे आणखी एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पॅराग्लायडिंग करण्याचे उत्तम ठिकाण आहे. इथून तुम्हाला पवना तलाव आणि आजूबाजूच्या टेकड्यांचे चित्तथरारक नजारेही पाहता येतात. तसेच ऑक्टोबर ते जून या कालावधीत तुम्ही येथे पॅराग्लायडिंगचा आस्वाद घेऊ शकता.
नंदी हिल्स, बंगलोर –
भारतातील पॅराग्लायडिंगचे लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे बंगळुरूचे नंदी हिल्स हे आहे. येथे तुम्ही डोंगर आणि दऱ्यांनी वेढलेल्या सुंदर दृश्यांसह पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता. सुंदर दृश्यांसोबतच इथले शांत वातावरणमध्ये तुमचं मन खूप रमणार. ऑक्टोबर ते मे या कालावधीत तुम्ही पॅराग्लायडिंगसाठी येथे येऊ शकता.