5 Dangerous Ghats In Maharashtra : पावसाळ्यात महाराष्ट्रातील 5 खतरनाक घाट; प्रवास करताना सावधगिरी बाळगा

5 Dangerous Ghats In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 5 Dangerous Ghats In Maharashtra । पावसाळा म्हंटल कि येतो पर्यटनाचा जोर… पावसाच्या सऱ्यात निसर्गाच्या कुशीत जाण्याचा, हिरव्यागार वातावरणात निसर्गाशी एकरूप होण्याचा मोह कोणाला आवडत नाही?? प्रत्येकालाच पावसाळ्यात पर्यटन करायला आवडत. मात्र खराब रस्ते, कमी रुंदी यामुळे पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागू शकते. तुम्ही सुद्धा पावसाळयात बाहेर फिरण्याचा प्रवास करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यातील ५ धोकादायक घाटांबद्दल सांगणार आहोत, जिथून प्रवास करताना तुम्हाला चांगलीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. हे धोकादायक घाट कोणते आहेत? ते आपण सविस्तर पाहुयात….

१) माळशेज घाट (Malshej Ghat)

नाशिक- मुंबई मार्गावरील माळशेज हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असले तरी पावसाळ्यात (5 Dangerous Ghats In Maharashtra) येथे अत्यंत सावधगिरीने गाडी चालवावी लागते. माळशेज घाट हा 9 किमी लांबीचा आहे आणि पावसाळ्यात तीव्र धुके, जोरदार पाऊस आणि धबधब्यांमुळे रस्ता निसरडा होतो. रस्त्याच्या बाजूला खोल दऱ्या आणि अरुंद वळणे यामुळे वाहनचालकांसाठी धोका वाढतो.

२) आंबेनळी घाट (Ambenali Ghat)– 5 Dangerous Ghats In Maharashtra

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट अतिशय अरुंद आणि खड्डेमय आहे. पावसाळ्यात जोरदार पाऊस आणि धुके यामुळे घाटातील दृश्यमानता जवळजवळ शून्य होते. रस्त्याच्या बाजूला खोल दरी असल्याने आणि खडबडीत रस्ता असल्याने अपघातांचा धोका जास्त आहे. हा घाट अवघड मानला जातो आणि अनुभवी चालकांसाठीच योग्य आहे. नवीन चालकांनी या घाटातून प्रवास करताना खबरदारी घ्यावी.

3) कशेडी घाट (Kashedi Ghat)

मुंबई-गोवा-कोची राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात अनेक धोकादायक वळणे आणि अधून मधून तीव्र उतार असल्याने गाडी चालवताना अत्यंत सावधगिरीने चालवावी लागते. पावसाळ्यात (5 Dangerous Ghats In Maharashtra) रस्ता या घाटात निसरडा होतो आणि दाट धुके दृश्यमानता कमी करते. घाटातील रस्त्याची रुंदी कमी असल्याने मोठ्या वाहनांसाठी हा घाट विशेषतः धोकादायक आहे. आंबेनळी घाटात अपघातांचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागते.

४) आंबोली घाट (Amboli Ghat)

कोल्हापूर-सावंतवाडी मार्गावर असलेल्या आंबोली घाटात महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडतो. सततचे धुके आणि मुसळधार पावसामुळे आंबोली घाटातील रस्ता अत्यंत निसरडा होतो. रस्त्याच्या बाजूला खोल दऱ्या आणि अरुंद मार्ग यामुळे धोका वाढतो. शक्यतो या घाटातून पावसाळ्यात प्रवास टाळणे सूयिस्कर ठरते, कारण येथे दरडी कोसळण्याचाही धोका असतो. तरीही तुम्ही प्रवास करणार असाल तर अतिशय सावधगिरीने प्रवास करा.

5) वरंधा घाट (Varandha Ghat)

पुणे-महाड मार्गावरील वरंधा घाट हा 5 किमी लांबीचा घाट आहे. मात्र पावसाळ्यात खड्डेमय आणि निसरडा होतो. जोरदार पाऊस आणि धुके यामुळे दृश्यमानता कमी होते, आणि रस्त्याच्या बाजूला खोल दऱ्या आहेत . रस्त्याची देखभाल कमी असल्याने हा घाट वाहनचालकांसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा.